नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी क्लासेससमोरील रस्त्यावर एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीवर तरूणाने खंजरने 3 वार केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोचिंग क्लासेस परिसरात एकच खळबळ उडाली.हल्लेखोराला भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शिवाजी पोहरे हा युवक विद्यार्थींनीला ओळखत होता. त्याने तिला आपण लग्न करू, तसेच ’तू मला आवडतेस’ असे सांगितले. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यानंतर सोमवारी दुपारी भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी क्लासेससमोरील रस्त्यावर अभ्युदय बँकेजवळ रोहितने विद्यार्थीनीला गाठले आणि तिच्यावर खंजरने हल्ला केला. त्याने तिच्यावर तीन वार केल्याने ती गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते हे कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेतील विद्यार्थीनीला उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोचिंग क्लासेसच्या परिसरात भरदिवसा तरुणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Kanthak Suryatal Post Views: 329 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन; उमरी (रे.स्टे.) येथे आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त