माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता-पिता व शहीद जवानांच्या नातेवाईकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) –  भारतीय सैन्य दलाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-कश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीची जनतेला माहिती व्हावी तसेच देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी ‘शौर्यदिन’ साजरा करण्यात येतो.
यावर्षी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे ‘शौर्यदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता-पिता, शहीद जवानांचे नातेवाईक तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!