नांदेड(प्रतिनिधी)-सय्यद रहमतउल्लाह शाह यांनी वफ्फ बोर्डाने त्यांच्याविरुध्द दिलेल्या आदेशाला वफ्फ ट्रिबुनल औरंगाबाद येथे पुढच्या तारेखपर्यंत स्थगिती मिळवली आहे. हा स्थगिती आदेश 29 ऑक्टोबर रोजी झालेला आहे. तो आदेश महाराष्ट्र वफ्फ ट्रिबुनलचे अध्यक्ष वाय.एम.एच.खराडी आणि सदस्य अनंत गव्हाणे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेला आहे. नांदेडमध्ये खडकपुरा येथे असलेल्या दर्गाह शाह रहेमान आणि मस्जिदीबाबत अनेक वाद सुरू होते. या संस्थेकडे जवळपास 35 एकर जागा 1950 पासून आहे. या संस्थेच्या मस्जिदचे नाव जामिया मस्जिद म्हणून प्रसिध्द आहे. 1950 ची ही जागा आज 2026 पर्यंत मोठ्या किंमतीची झाली. त्यामुळे जमीनीचे वादही येवू लागले. तेंव्हा या दर्गाचे मुळ मुतवली सय्यद रहमतउल्लाह शाह सय्यद याकुब शाह यांनी नंादेडमध्ये नायब मुतवल्ली म्हणून शेख शमीम शेख इसाक यांची नेमणूक केली. त्यावरही बरेच वाद सुरू होते. पण 2026 मध्येच शेख मुत्तवल्ली यांची हत्या झाली. त्यानंतर 25 ऑगस्ट 2026 मध्ये वफ्फ बोर्डाने सय्यद रहेमतउल्लाह शाह याकुब शाह यांची नियुक्ती मुतवल्ली पदावरून रद्द केली आणि आता दर्गाह आणि मस्जिदीचे व्यवस्थापन थेट महाराष्ट्र राज्य वफ्फ मंडळाच्या अखत्यारीत येईल असे आदेश जारी केले. या नंतरसय्यद रहेमतउल्लाह शाह सय्यद याकुब शाह यांनी महाराष्ट्र वफ्फ ट्रिबुनल यांच्याकडे वफ्फ अर्ज क्रमांक 102/2026 हा दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी दाखल केला.यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान वफ्फ ट्रिबुनलने यातील केवेट धारक प्रतिवादी क्रमांक 3 मोहम्मद अब्दुल हाफीज मोहम्मद अब्दुल जब्बार यांच्यासह प्रतिवादी क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य वफ्फ बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिवादी क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र बोर्ड वफ्फ यांना नोटीसा काढल्या आणि पुढील सुनावणीची तारीख 29 ऑक्टोबर अशी दिली. 29 ऑक्टोबर रोजी प्रतिवादी क्रमांक 1 आणि 3 हे हजर होते आणि प्रतिवादी क्रमांक 1 ने काही काळ मागितला. या सर्व बाबींना ग्रहीत धरुन वफ्फ ट्रिबुनलचे चेअरमन वाय.एम.एच.खराडी आणि सदस्य अनंत गव्हाणे यांनी या प्रकरणाच्या पुढील तारेखपर्यंत 25 ऑगस्ट 2026 रोजी वफ्फ बोर्डाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील तारीख 19 नोव्हेेंबर 2026 अशी आहे. Kanthak Suryatal Post Views: 55 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन महिलांचे सोन्याचे दागिने लंपास