नांदेड (प्रतिनिधी) – आगामी दसरा, दिवाळी आणि छठ पूजा सणांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेची गाडी क्रमांक 07601/07602 जालना–येलहंका–जालना विशेष रेल्वे सध्याच्या वार, वेळा, थांबे व देखभाल व्यवस्थेसह पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष गाडी 1.3 पट भाडे आकारणीसह चालविण्यात येईल.

गाडी क्रमांक 07601 जालना–येलहंका ही विशेष गाडी दर रविवारी धावणार असून 4 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या नियोजित कालावधीवरून 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या कालावधीत 4 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येतील.
गाडी क्रमांक 07602 येलहंका–जालना विशेष ही सोमवारची सेवा असून, तिची सेवा 5 ऑक्टोबर 2026 वरून 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्याही 4 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येतील.
या विशेष रेल्वे गाडीला एकूण 22 LHB डबे असतील. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यास मदत होणार असून, प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाडी चा लाभ घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.
प्रवाशांनी आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, रेल्वे आरक्षण केंद्रे किंवा RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!