घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा डल्ला; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पवननगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८५ हजार ५३४ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर, नांदेड येथील फिर्यादी तुळशीराम धावर राठोड (वय ५०) यांच्या राहत्या घरी दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या कुलूपाची कोंडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८५ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी तुळशीराम धावर राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३)(४) व ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत. शहरातील रहिवासी भागात झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. Kanthak Suryatal Post Views: 166 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रीलचा धुमाकूळ, शेतकऱ्याचा राख झाला पाच एकर ऊस! मोदींना प्रश्न विचारला अन् व्हिसा कापला? नॉर्वेच्या पत्रकाराचा अमित शाहंवर थेट घणाघात