नांदेड(प्रतिनिधी)- मौजे कौठा ता.बिलोली येथे घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना 26 एप्रिलच्या सकाळी 9.30 ते रात्री 8 वाजेदरम्यान घडली आहे. शेख सलीम आयात साब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे कौठा ता.बिलोली येथील त्यांच्या घराचा कुलूप कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात आणि किचन रुममध्ये पातेल्याखाली ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 709 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हायवा टिपर चोरीला गेला हेलीकॉप्टरने अमरनाथ यात्रेचे स्वप्न फसवणूकीने भंग झाले