नांदेड(प्रतिनिधी)-कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटूंबाचे घर बंद असल्याचे पाहुन चोरट्यांनी त्यातून 115 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे ज्याची किंमत पोलीस विभागाच्या अभिलेखात 3 लाख 45 हजार रुपये लिहिलेली आहे. चोरट्यांनी चोरून नेले आहे. नरसिंगराव दत्तय्या मासन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर अशोकनगर गोपाळचावडी येथे आहे. 24 एप्रिलच्या रात्री 9 ते रात्री 11 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय लेबर कॉलनी नांदेड येथे कार्यक्रमासाठी गेले असतांना चोरट्यांनी घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील 115 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. या दागिण्यांची किंमत 3 लाख 45 हजार रुपये असल्याची माहिती पोलीस विभागाने जारी केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 357, 380 नुसार दाखल केला असून तपास महिला पोलीस उपनिरिक्षक कदम ह्या करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 3,612 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये उनकेश्र्वर येथील पोचन्ना मंदिरातील दान पेटी चोरीला गेली