अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

लोहा – तालुक्यातील मौजे मुंगेगाव येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी लोहा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास मुंगेगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह पार पाडण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी चंद्रकांत सुदाम गंदलवार, सुरेखा चंद्रकांत गंदलवार (दोघे रा. पेनूर, ता. लोहा), संतोष बबनराव गटलेवार, समीआ उर्फ नीता संतोष गटलेवार, आफिश संतोष गटलेवार (रा. बबळेश्वर नगर, परभणी) तसेच समर्थ चंद्रकांत स्वामी (रा. लोहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामपंचायत अधिकारी मोहन किशनराव राहुलवाड (वय ४८, रा. लोहा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोउपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!