नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि सुमित (८) आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिमायतनगर जवळील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या सुनील मोरेंनी १७ जुलै रोजी सकाळी ७:५० च्या सुमारास आपल्या विक्रांत गाडीसह मुगट पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली. ही घटना निव्वळ अपघाती नसून, प्रशासकीय छळाचा एक धक्कादायक प्रकार असल्याचे समोर येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आपली व्यथा मांडली होती. या स्टेटसमध्ये त्यांनी तत्कालीन हदगावचे गटशिक्षणाधिकारी किसन फोले, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बच्चे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सह शिक्षक दत्ता पवळे यांच्याकडून होणाऱ्या प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि SDRF च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढले. एका कर्तव्यदक्ष शिक्षकाला आपल्या पोटच्या गोळ्यांसह मृत्यूला कवटाळावे लागते, ही बाब शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, सुनील मोरेंना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. ही वेळ केवळ हळहळ व्यक्त करण्याची नसून, व्यवस्थेतील या मानसिक छळा विरुद्ध आवाज उठवण्याची आहे. #JusticeForSunilMore #NandedNews #EducationSystem #SuicideCase #Justice Kanthak Suryatal Post Views: 3,713 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सावधान! तुमच्या कारमध्ये इथेनॉल की पांढरे दही? राहुल गांधींचे छात्रों की गूंज आणि धामी सरकारची धाकधूक; देहराडूनमध्ये नक्की काय घडतंय?