नांदेड (प्रतिनिधी) – निराळी समाजातील विवाहोत्सुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, समाजातील वैवाहिक संबंध अधिक दृढ व्हावेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने निराळी समाज सेवा प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी वामनराव पावडे मंगल कार्यालय, पूर्णा रोड, नांदेड येथे होणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील निराळी समाजातील विवाहोत्सुक युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा असून, समाजातील कुटुंबांना एकमेकांशी परिचित करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. मेळाव्यासाठी युवक-युवतींची नोंदणी सुरू झाली असून, पालकांनी समितीने उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे आपल्या पाल्यांचा बायोडाटा भरावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, राज्याबाहेरील समाजबांधवांनाही याचा लाभ घेता येणार आहे. उपवधूंच्या बायोडाटा व देणगीसंदर्भातील माहितीसाठी चंद्रकांत कळसकर (9860326942), उपवरांच्या नोंदणीसाठी 9021277769, तर देणगीसाठी पांडुरंग गज्जेवार (9423441708) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुगल फॉर्म भरण्यात अडचण आल्यास संबंधित गाव किंवा शहरातील मेळावा समन्वयक आवश्यक मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. हा मेळावा केवळ वधू-वर परिचयापुरता मर्यादित नसून समाजातील ऐक्य, परस्पर संवाद आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विनायक कळसकर, मोहन कुरुडे, नारायण पारेकर, चंद्रकांत दामेकर, पांडुरंग गज्जेवार, प्रभाकर पारेकर, बालाजी भांगे, संजय गरुडकर, श्याम एमेकर, उमेश गरुडकर, चंद्रकांत कळसकर आणि रामकिशन इंदुरकर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. समाजातील सर्व बांधवांनी या राज्यस्तरीय उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निराळी समाज सेवा प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 687 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती; तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार पैशांच्या वादातून तरुणाचा चाकूने खून; आरोपी अटकेत