नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंधाघाट परिसरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. या घटनेत हरियाणा राज्यातील एका तरुणाचा गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3.11 वाजता बंधाघाट येथील मोकळ्या जागेत ही घटना घडली. अमित वर्मा (रा. पानिपत, हरियाणा) याचा महावीरसिंह सुखदेवसिंह (वय 39, रा. रतनगड, अमृतसर, पंजाब) याने पैशांची परतफेड करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गळ्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमित वर्मा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी विजयकुमार कुसम्या नंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 358/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 103(1) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वजिराबाद २पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, खुनामागील नेमके कारण, आर्थिक व्यवहाराचा तपशील आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वजिराबाद पोलीस करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,168 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टाटा इंडिगो कारसह २.२३ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त; मरखेल पोलिसांची धडक कारवाई मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी