हजारो भाविकांचा सहभाग; गोदावरीच्या पवित्र जलाने मंदिरास जलाभिषेक नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळीच्या पूर्वसंध्येला सचखंड श्री हजूर साहिब येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पार पडणारा जलस्नान सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होत धार्मिक परंपरेचे जतन केले. सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच भाविकांनी घरातील विविध प्रकारची भांडी घेऊन नगीना घाट येथील गोदावरी नदीच्या तीरावर गर्दी केली होती. गोदावरी नदीचे पवित्र जल भांड्यांमध्ये भरून भाविक सचखंड श्री हजूर साहिब येथे दाखल झाले. त्यानंतर या पवित्र जलाने मंदिराचा पारंपरिक जलस्नान सोहळा विधिवत पार पडला. या धार्मिक सोहळ्यात आबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वृद्ध नागरिक, महिला, युवक-युवती तसेच लहान बालिका आणि बालकांनीही आपल्या हाताने जल अर्पण करून या पवित्र परंपरेत सहभाग घेतला. श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांनी गुरूंचे आशीर्वाद प्राप्त केले.तखतस्नान सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला पार पडणाऱ्या या पारंपरिक धार्मिक सोहळ्यामुळे सचखंड श्री हजूर साहिब परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. Kanthak Suryatal Post Views: 130 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये वाहतूक कोंडीचा विळखा! दिवाळीची गर्दी की नियोजनाचा अभाव? रुग्णवाहिका अडकल्याने उपस्थित झाला गंभीर प्रश्न!