नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरचे नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी अत्यंत कु्ररपणे होणारी जनावरांची वाहतुक रोखतांना आज 10 म्हशी आणि 8 वासरे यांना मोकळा श्वास करून दिला. नांदेड शहराजवळ असलेल्या अर्धापूर पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारावर त्यांनी 4 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर 1.30 आहिल्यादेवी चौक अर्धापूर येथे सापळा रचला. यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमंाक एच.आर. 46 डी.4513 ला थांबवले. तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे 5 वर्षाच्या 5 म्हशी आणि व 4 वर्षाच्या 5 म्हशी तसेच मशीचे दुध पिते 12 दिवसांचे 8 वासरु असे 18 जनावर सापडले. त्यांना अत्यंत निर्धयीपणे वाहनात कोंबून जनांवरांची वाहतुक झाली. तसेच त्यांची देखभाल करण्यात कसुर झाली. या म्हशी आणि वासरांची किंमत 8 लाख 45 हजार रुपये आहे. तसेच त्यांची वाहतुक करणारा ट्रक 7 रुपयांचा आहे. असा एकूण 15 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाा आहे. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 171/2024 दाखल केला असून पोलीस अंमलदार कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,150 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी यांची आढावा बैठक लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र