नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार केंद्र म्हणून विष्णुपुरी येथी जिल्हा परिषद हायस्कूल केंद्राचे नाव पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा जपत या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे हे मतदान केंद्र सर्वांना आकर्षित करत आहे. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या इको फ्रेंडली मतदान केंद्राला भेट दिली. या भेटीचा उद्देश इको फ्रेंडली मतदान केंद्राची कल्पना आणि कार्यपद्धती समजून घेणे, मतदान केंद्राच्या पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे आणि मतदान केंद्राच्या यशाचे मूल्यांकन करणे हा होता. भेटीदरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांना मतदान केंद्राच्या वैशिष्ट्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यात सौर ऊर्जा, पाणी पुनर्वापर प्रणाली, मतदान साहित्याचा पुनर्वापर याची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राच्या यशाचे कौतुक केले तसेच ईतर काही मतदान केंद्र देखील इको फ्रेंडली व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. या भेटीमुळे इको फ्रेंडली मतदान कक्षांच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल आणि निवडणूक प्रक्रियेला अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होईल. असा विश्वास या निमित्ताने निर्माण झाला असल्याचे त्या म्हणाल्या. Kanthak Suryatal Post Views: 919 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ग्राम विकास अधिकाऱ्याची लुट सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत