नांदेड- चुनाव का पर्व, देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात सध्या सार्वत्रिक निवडणूकीची धूम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदा इकोफ्रेंडली मतदार ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी सूचना दिली आहे. याच सूचनेच्या अनुपालनासाठी जिल्हा ग्रामीण स्विप कक्षाच्या प्रमुख तथा जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूरी प्रशालेने इकोफ्रेंडली मतदान बुथ तयार केले आहे. याचे प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, डॉ सविता बिरगे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू , महसूल सहाय्यक मकरंद भालेराव, स्वीप कक्ष सक्रिय सदस्य राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी भेट दिली. संपूर्ण मतदान परिसर नैसर्गिक झावळ्यांनी, विविध रोपांनी, प्लास्टिक मुक्तपणे तयार केला आहे. पाणी पिण्यासाठी मातीच्या मातीच्या भांड्यांचा वापर केला आहे. ग्रीन मँट प्रवेशद्वायापासून अंथरली असून विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी प्रवेश केला जात आहे. केळीची पानं, पारंब्या, हिरव्या नारळाच्या झावळ्या उपयोगात आणल्यामुळे परिसर थंडगार व रमणीय आकर्षक झाला आहे. प्रात्यक्षिक मतदार म्हणून विलास देशमुख हंबर्डे, मारोती ग्यानबाराव हंबर्डे, बाबुराव नामदेवराव हंबर्डे यांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्ज्वला जाधव, शिवाजी वेदपाठक, कृष्णा बिरादार, दत्ता केंद्रे, संतोष देशमुख, आनंद वळगे, उदय हंबर्डे, विकास दिग्रसकर, चंद्रकला इदलगावे, अर्चना देशमुख, कांचनमाला पटवे, शैलजा बुरसे, प्रिती कंठके , एम.ए.खदीर , मारोती काकडे, कावळे गुरुजी आणि सर्व शिक्षकवृंदांनी भरीव परिश्रम घेतले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 686 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विदेशी चलन बदलून देण्यासाठी 1 लाख 45 हजार 700 रुपयांची फसवणूक जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे ‘एमसीएमसी ‘चे प्रमुख कार्य : अभिजीत राऊत