नांदेड (जी.मा .का.)-:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटेच्या प्रभावा पासून बचाव करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सूचना निर्गमित झाल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या कालावधीत मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव होण्यासाठी आरोग्य विभाग काळजी घेणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा व औषध उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. याबाबत नोडल अधिकारी व सहा. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाकडून उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात. Kanthak Suryatal Post Views: 1,153 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘ या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा : जिल्हाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड