नांदेड(प्रतिनिधी)-आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्वांचे आवडते प्राध्यापक डॉ.दिलीप पुरी यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आला तेंव्हा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
विद्यार्थी दशेपासून डॉ.श्री.दिलीप पुरी यांचा जनसंपर्क दांडगा होता. पुढे ते आपले शिक्षण पुर्ण करून आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे प्राध्यापक झाले. प्राध्यापक असतांना सुध्दा त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण देता-देता आपल्या दोन मुलांना सुध्दा डॉक्टर बनवले. काही वर्षांपुर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. काल दि.27 मार्च रोजी रात्री त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट येथील स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असे परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!