नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक विशेष कामगिरी करत एका युवकाकडून बनावट प्रकारचे देशी पिस्टल जप्त केले आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अभिलेखावर असलेले गुन्हेगार आणि फरार असलेले गुन्हेगार यांची शोध मोहिम राबवत असतांना इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने कॅन्सर हॉस्पीटल जवळ 26 मार्च 2024 रोजी रात्री 10.25 वाजता सुशिल मनोहर गावखोरे यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. त्याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा क्रमांक 244/2024 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकात असलेले पोलीस अंमलदार अर्जुन मुंढे, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, सायबर विभागाचे राजू सिटीकर यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!