नांदेड:- लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात शनिवारी रात्री आठ वाजता आकाशवाणी नांदेड वर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित केली जात आहे. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक शांतता व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय पातळीवर जोरात तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक तयारीच्या त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. त्यांची मुलाखत नांदेड येथील पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतली आहे. सदर मुलाखतीचे प्रसारण शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी रात्री 8.00 वाजता आकाशवाणी नांदेड केंद्र वरून प्रसारित होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 722 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये -जिल्हाधिकारी सिईओ करनवाल व आयुक्त डोईफोडे स्वीप कक्षासाठी नोडल अधिकारी घोषित