गोवंश हत्या न करण्यासाठी मुस्लिम समाज सार्वजनिक जनजागृती करत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-27 मे रोजी होणाऱ्या ईद-उल-अजहा या दिवशी पशुंची बळी देण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. त्या संदर्भाने मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते, संघटना आणि धर्मगुरु यांनी एकत्रितपणे कुलजमाती तहेरीक या सामाजिक चळवळीच्या माध्यमाने गोवंशाचा बळी दिला जाणार नाही याची जागरुकता करण्यात आली आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले. सोबतच त्यांनी ही पण मागणी केली की, मुस्लिम समाजाला त्रास देण्यासाठी होणाऱ्या घटनाक्रमांवर सुध्दा कुठे तरी वचक बसला पाहिजे अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मौलाना वसिम हुसेनी साब , मौलाना वसिमसाब यांच्यासोबत वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांमध्ये ऍड.अब्दुल रहेमान सिद्दीकी, सय्यद मोईन, फेरोज लाला, शेरअली, शमीम अब्दुला, बाबु खोकेवाले, अजित कुरेशी, साबेर चाऊस हे सर्व उपस्थित होते. या पत्रकार परिषदेची सुरूवात ऍड. शाहेद यांनी केली.
या प्रसंगी पुढे बोलतांना असे सांगण्यात आले की, प्राणी संरक्षण कायद्यामध्ये गोवंश हा शब्द 1995 ला आला. त्या अगोदर गाईंची हत्या तर प्रतिबंधीत होतीच पण बैल अर्थात गोवंशाचा बळी देण्यामध्ये तो बैल शेतीच्या कामकाजासाठी उपयुक्त नसावा असे प्रमाणपत्र पशु वैद्यकीय अधिकाऱ्याने दिल्यानंतर त्याचा बळी दिला जात होता. सर्वत्र बकरी ईद हा शब्द जो प्रचारीत झाला आहे हा शब्द चुकीचा असून सांगतांना या दिवसाचे खरे नाव ईद-उल-अजहा किंवा ईद-उल-कुर्बान असे असल्याचे सांगण्यात आले. बकरी ईद या नावाची कोठेच मुस्लिम धर्मामध्ये नाही. पशु बळी देण्यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत. त्याची चर्चा आज करण्यापेक्षा आम्ही गोवंशाच्या पशुची बळी देणार नाही हे स्पष्ट करतांना सांगितले की, कोणत्याही मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने गोवंश केला तरी त्याचा बळी देण्यासाठी कुरेशी समाजाचा व्यक्तीच असावा लागतो. या संदर्भाने आमच्या धार्मिक गुरूंनी या सर्व कुरेशी समाजाची बैठक घेवून त्यांना कोणत्याही प्रकारे गोवंशाचा बळी देऊ नये असे आदेश दिले आहेत आणि कुरेशी समाजाने सुध्दा ते मान्य केले आहेत. एकंदरीत आम्ही या पुढे गोवंशाची हत्या होणार नाही यासाठी सर्व परिने प्रयत्न करणार आहोत.
हे सर्व सांगत असतांना या मुस्लिम बांधवांनी अशी मागणीही केली की, बैल विक्री करणार, तो खरेदी करणारा आणि हत्या करणारा असे तिन लोक जबाबदार आहेत. त्या तिघांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. पण प्रशासन फक्त ज्याच्या ताब्यात बैल आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल करतात. सोबतच पशु वाहतुक होत असतांना ज्या पशुंची बळी देण्याची परवानगी कायद्यात आहे किंवा आमच्या धर्मात जे पर्याय आहेत. त्या पशुंना सुध्दा पकडले जाते. त्यांच्याकडून चिरीमिरी घेतली जाते, मारहाण होते. या सर्व घटनाक्रमाला सुध्दा थांबविण्यात यावे अशी मागणी आम्ही कुल जमाती तहेरीक च्यावतीने प्रशासनाला सुध्दा करणार आहोत असे सांगितले. कायद्यानुसार बळी प्रथा आम्ही पार पाडत असतांना फक्त मुस्लिम समाजाला त्रास देण्यासाठी ज्या काही घटनाक्रमांना समोर आणले जाते अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!