नांदेड (प्रतिनिधी)- परवा रविवारी रात्री झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. नवी वाडी परिसरात रविवारी रात्री जुन्या वादातून प्रताप दत्तात्रय गायकवाड (वय २६) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी धारदार शस्त्राने शरीराच्या विविध भागांवर वार केल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विजय रुक्ममण वायवळ, सुरज सदाशिव बुक्तरे आणि अनिकेत उर्फ सोनू सदाशिव बुक्तरे या तिघांना अटक केली आहे. जुने भांडण आणि वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपींना अल्पावधीतच जेरबंद केले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन व पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांनी न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तिन्ही आरोपींना ( 3 दिवसांची) पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत. मयत प्रताप गायकवाडचा .. संबंधित बातमी …. नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून Kanthak Suryatal Post Views: 2,648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड शहरात २४ तासातच दुसरा खून नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; ₹4.65 लाखांचा महसूल वसूल