डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरी

नांदेड – दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन आणि जर माणूस म्हणून पुन्हा जन्मलो तर फक्त भीमरायांचाच भक्त होईन, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज १३५ वी जयंती निमित्त जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे त्यांच्या प्रतिमेस डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा हिवताप कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक कैलास सावळे, वरिष्ठ लिपिक अशोक हरनाळीकर, दिलिप राठोड,आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गणलेवार, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, आरोग्य कर्मचारी सुरेश पिंपळगावकर, किरण कुलकर्णी,वाहन चालक मुकुंद देवकांबळे मामा, परमेश्वर मठदेवरु, कैलास कुंटूरवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!