अर्धापुर येथे नकली जर्दा बनविणाऱ्याचा पर्दाफाश; देगलूरात जुगार अड्ड्यावर छापा – 7 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड( प्रतिनिधी)- परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या अधिपत्याखालील पथकाची नांदेड जिल्ह्यात रवानगी करण्यात आली होती. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी या पथकाला अर्धापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे सय्यद जाकीर उर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40, रा. इंदिरानगर, अर्धापुर) हा नकली सुगंधित जर्दा तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या घरी छापा टाकला असता, तेथे सुगंधित जर्दा, जर्दा तयार करण्याची मशीन, ग्लिसरीन व पॅराफीन असा एकूण 3,44,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपी कमी प्रतीच्या जर्दामध्ये ग्लिसरीन व पॅराफीन मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने सुगंधित जर्दा तयार करून मशीनद्वारे पॅकिंग करून बाजारात विक्री करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी आरोपी सय्यद जाकीर यास ताब्यात घेऊन अर्धापुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026, कलम 123 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी या पथकाने देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कुषावाडी शिवारातील रंजित भाऊराव इंगोले यांच्या शेतातील आखाड्यावरील खोलीत ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 36,340 रुपयांची रोकड, 8 मोबाईल फोन व 7 मोटारसायकली असा एकूण 3,93,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन मैसनवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 7,37,790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती गोपनीयपणे 9150100100 या ‘खबर’ हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 772 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले दिल्लीजवळील बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्थानकावरून महिलांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप