नांदेड (प्रतिनिधी) – आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून शैलेश व प्रतीक्षा चक्रवार या दाम्पत्याने आपला मुलगा चि. श्रेयांश याचा प्रथम वाढदिवस भव्य समारंभात न साजरा करता, आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या अनाथ मुलांसोबत साजरा करण्याचा हृदयस्पर्शी निर्णय घेतला. हा आगळावेगळा वाढदिवस धनगरवाडी येथील लहुजी साळवे अनाथ आश्रमात उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात माणसाची ओळख जात, धर्म, पंथावरून होते. पण दुःखाला जात नसते आणि माणुसकीला धर्म नसतो. ज्यांचा वाढदिवस कोणीच साजरा करत नाही, अशा चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा वाढदिवस. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे यापेक्षा मोठी समाजसेवा नाही. अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याची आमच्या सुनेची संवेदनशीलता मनाला भावणारी आहे. यावेळी केवळ केक कापून न थांबता आश्रमातील बालकांना “अन्नदान व शालेय साहित्याचे वाटप” करण्यात आले. मुलांच्या टाळ्या आणि निरागस हास्यात श्रेयांशचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय आणि मनाच्या कोंदणात कायमचा कोरला जाणारा ठरला. या प्रसंगी अनाथाश्रमाचे चालक लालबाजी घाटे, साहेबराव गव्हाणकर, पवन गोनेकर, गणेश कोनेकर, प्रतिभा जाधव व कर्मचारी उपस्थित होते. वाढदिवसावर हजारो रुपये खर्च करून मोठेपण मिरवण्यापेक्षा, एका निराधाराच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण पेरणे हाच खरा संस्कार आहे. श्रेयांशच्या या पहिल्या वाढदिवसाने समाजाला हाच संस्कार दिला आहे. समाजातील प्रतिष्ठित मंडळींनीही आपल्या नातलगांचा वाढदिवस साजरा करताना अनाठायी खर्च न करता समाजातील अनाथ, पीडित, वार्धक्याने झुकलेल्या गरजूंना मदत करावी, असे आवाहन करतो. – चंद्रकांत चक्रवार, निवृत्त शिक्षक (आजोबा) Kanthak Suryatal Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नाना पाटेकर मंचावर विडंबन अभिनयातून ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर घणाघाती प्रहार; कलाकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षक सुन्न