नांदेड – शहरातील कौठा गोवर्धनघाट रामसेतू पुलानजीकच्या विजयनगर मधील रहिवासी अथर्व बालाजी नीलपत्रेवार या १७ वर्षीय तरुणाचे गुरुवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले. तो १७ वर्षांचा होता. तो बारावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई युनायटेड पद्मशाली संघमच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रगती बालाजी नीलपत्रेवार, वडिल जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत मनपामध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले बालाजी नीलपत्रेवार आणि बहीण असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या नागरिकांना आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचा मोबाईल क्रमांक ९१५०१००१०० असा आहे. नागरिकांनी आपल्या भागात जुगार अड्डे किंवा अन्य अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती असल्यास ती ‘खबर’ हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 132 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ॲड. पंचशील कांबळे यांच्यावरील आकस बुद्धीने प्रेरित हद्दपारीची कार्यवाही रद्द करा – नांदेड अभिवक्ता संघाची मागणी