धर्माबाद (प्रतिनिधी) : धर्माबाद तालुक्यातील शंकरगंज येथे चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल ₹1,21,610 किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ५ एप्रिल रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी घरातील आलमारीतील रोकड ₹1,21,610 चोरून नेली आहे. या प्रकरणी फिर्यादी विनोदकुमार राघवेंद्रराव मानुरकर (वय ६० वर्षे, रा. शंकरगंज) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गु.रु. नं. ८१/२०२६, कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 685 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ? घरफोडी प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत, 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त