नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत घरफोडी प्रकरणातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 90 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1195/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4) व 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून शेख जावेद उर्फ जेबी शेख खुर्शीद (वय 23, रा. जोगनगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व इतर ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,062 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा श्वान टायसन अव्वल; सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या -बंटी लांडगे