नांदेड (विशेष प्रतिनिधी) – दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. आपल्या घरात दीप उजळत असताना समाजातील वंचित आणि रस्त्यावरील निराधार बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या पुढाकाराने एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत निराधार व गरजू बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचा दिवा पेटवण्यात आला. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या उपक्रमात शहरातील विविध भागांतील गरजू व निराधार व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना खाद्यपदार्थ आणि रोजच्या गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. सणासुदीच्या काळात अशा प्रकारची प्रत्यक्ष मदत मिळाल्यामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. या प्रसंगी बोलताना युवा साहित्यिक सोनू दरेगावकर म्हणाले, आपला आनंद द्विगुणीत करायचा असेल, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तो पोहोचवला पाहिजे. आपल्या छोट्याशा योगदानाने कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलू शकते, हाच या उपक्रमामागचा उद्देश होता. केवळ दिव्यांची रोषणाई न करता निराधार बांधवांच्या आयुष्यात माणुसकीचा प्रकाश निर्माण करणे हीच खरी दिवाळी आहे. या उपक्रमाला सिद्धांत वाघमारे, शुभम गिरी, सतीश गोवंदे, ज्ञानेश्वर डाकोरे यांनी परिश्रम घेतले. व स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद मिळत असून, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या या संवेदनशील व कौतुकास्पद सामाजिक कार्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 121 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मनाठा पोलिसांची कारवाई; कत्तलीसाठी जाणारा ७९ गोवंशीय जनावरांचा कंटेनर पकडला