भोकर (प्रतिनिधी)-शहरातील नेहरूनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद ताजुद्दीन मोहम्मद मुनिरोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून ते १९ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या नेहरूनगर येथील घराला कुलूप लावले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या कडी-कोंड्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील विविध वस्तूंसह एकूण ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस नेला.या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५.९६/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
