परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी अधिकाऱ्याने तीन वेळा सापळा रचूनही लाच स्वीकारली नसल्याने अखेर त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंढे यांना अटक होताच नागरिकांनी फटाके वाजवून अन्याया विरुद्ध आनंद व्यक्त केला आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय पुरुष तक्रारदार यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांना कोर्ट जामिनासाठी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी तहसीलदार मुंडे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, तहसीलदार मुंडे यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी एसीबी बीड कार्यालयात धाव घेतली. पडताळणीत मागणी उघड तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ पडताळणीचे नियोजन केले. तक्रारदार आणि पंच यांना तहसील कार्यालयात पाठवण्यात आले. तहसीलदार मुंडे यांनी एका चिठ्ठीवर ५० आकडा लिहून ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने कमी करण्याची विनंती केल्यानंतर तडजोडीअंती चिठ्ठीवर २५ आकडा लिहून २५ हजार रुपये मागितले. त्यानंतर झालेल्या बोलणीत २० हजार रुपये देतो असे म्हणताच आरोपीने आणखी तीन टाका असे म्हणून २३ हजारांची मागणी केली. शेवटी ठीक आहे, पेंडिंग ठेऊ नका असे सांगत त्याने २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. तीन वेळा हाणून पडला सापळा पडताळणीनंतर दि. ११ फेब्रुवारीलाच सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. मात्र, आरोपी मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही. दि. १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला; परंतु यावेळीही ते लाच घेण्यास तयार झाले नाहीत. दि. १७ फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा सापळ्याचा प्रयत्न केला असता, तक्रारदाराने मुंडे साहेब, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पाकीट आणले आहे,असे म्हटल्यानंतर आरोपीला संशय आला आणि तो काही न बोलता शासकीय वाहनाकडे निघून गेला. यानंतर तक्रारदाराने एसीबीला कळवले की, आरोपी यापुढे लाच स्वीकारणार नसल्याचे दिसते. अखेर गुन्हा दाखल, घरझडती सुरू तक्रारदाराच्या निवेदनानंतर एसीबीने कारवाईचा पवित्रा बदलत आरोपी तहसीलदार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल हँडसेट (एक अॅपल कंपनीचा ५० हजारांचा व एक सॅमसंग कंपनीचा ३० हजारांचा) जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस ठाणे परळी वैजनाथ शहर येथे आरोपी तहसीलदार व्यंकटेश बाबुराव मुंडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी मुढेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे (छत्रपती संभाजीनगर) आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे (तपास अधिकारी), तसेच पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, पांडुरंग काचगुंडे, मच्छिंद्र बीडकर, अनिल शेळके, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, संतोष राठोड, राजकुमार आघाव, बिभीषण सांगळे, सचिन काळे आणि चालक गणेश म्हेत्रे, अंबादास पुरी यांचा समावेश होता. Kanthak Suryatal Post Views: 1,824 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले टिपू सुलतान: आगडोंब आणि संविधानातील स्थान – एक विश्लेषण