नांदेड – शहरातील नवोदित कवयित्री निलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या आनंदी चांदणे या ललित काव्यसंग्रहाचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील आलेले अनुभव.. समाजातील संवेदनशीलता.. निसर्ग…जीवन शैली.. आदी विषयावरच्या त्यांच्या या कविता आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री व स्त्री रोग तज्ञ डॉ.वृषाली किन्हाळकर व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी डॉ.जीवन पिंपळवाडकर, ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.दिगंबर भास्करराव जोशी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दि.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर येथील हॉटेल अतिथी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास निमंत्रितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निलम प्रसाद नांदेडकर (कुलकर्णी) व प्रसाद प्रकाशराव नांदेडकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 596 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का? फौजदारी न्यायव्यवस्थेतील दुहेरी मापदंड : समान उत्तरदायित्वाची गरज