नांदेड(प्रतिनिधी)-59 वर्षाच्या पायी चालणाऱ्या महिलेल्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन दोन अनोळखी चोरट्यांनी तोडून पळाले आहेत. सरोजीनी भुमन्ना जज्जरवार या गृहणी 8 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता आपल्या घरापासून स्वप्नजा गार्डन झेंडा चौक अशा पायी चालत असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 33 हजार 342 रुपयांची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 208/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,196 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लिंबगाव पोलीसांनी बेकायदा वाळूची एक हायवा आणि एक टिपर अशा दोन गाड्या पकडल्या बनावट मृत्यूपत्राच्या आधारावर संपत्तीचा फेरफार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल