सहस्रकुंडच्या धबधब्यामध्ये सात जण अडकले; मच्छीमारच्या साह्याने सात जणांना वाचवण्यात यश

ईस्लापूर-परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा येथील मध्यभागी विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले सात जण अडकले असून या सातही जणांना बाहेर काढण्यात मच्छीमाराच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.
विदर्भातील उमरखेड तालुक्यातील एकंबा येथील रहिवाशी असलेले नऊ जण इस्लापूर येथे कामासाठी आले होते. सदरील काम आटोपून सहस्त्रकुंड येथील मध्यभागातील धारे वरून आपल्या गावाकडे एकंबा येथे जात असताना त्यातील नऊ पैकी दोन जण बाहेर निघाले परंतु सात जण मध्यभागी येताच अचानक पाणी वाढल्याने व मुरली येथील बंधार्‍याचे पाणी सोडल्यामुळे पाणी प्रवाहामध्ये वाढ होऊन या ठिकाणी सात जण अडकले यामध्ये एकबा येथील अनुसयाबाई दिगंबर ताळमवाड वय 52 वर्ष, जगजराबाई ताटेवाड वय 50 वर्षे , सुवर्णा मोतीराम कादरवाड वय 16 वर्षे, पूजा दिगांबर ताळमवाड, वय 16 वर्षे ,कोमल ताटेवाड व 14 वर्षे व दोन लहान बालके होती. या घटनेची सर्वप्रथम माहिती सहस्त्रकुंड येथील ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. प्रशासनाला याबाबत सूचना देताच त्यांनी यंत्रनेला सूचना दिल्या. तहसीलदार चौंडेकर यांनी घटनास्थळी महसूलचे कर्मचारी घेऊन काढण्यात मच्छीमाराच्या साह्याने काढण्यात त्यांना यश आले.यावेळी मच्छिमार बाळू माधव चोपलवाड, दत्ता माधव चोपलवाड, दत्ता विठ्ठल उटलवाड, अनिल शंकर भट्टेवाड, सुनील शंकर भट्टेवाड, रामलु गटलवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश भोसले, पोलीस उपनिरिक्षक कोमल कागणे, पोलीस अंमलदार ओमप्रकाश डिडेवान, प्रफुल्ल जाधव यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या घटनेबाबत इस्लापूर परिसरात माहिती मिळताच सहस्त्रकुंड धबधबा या ठिकाणी बघणार्‍याची मोठी गर्दी उसळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!