*पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा* नांदेड- सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पिक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. 1️⃣ काढणीस आलेले सोयाबीन पिक शक्य तितक्या लवकर काढून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावे. 2️⃣ थ्रेशिंगचे काम (दाणे काढणी) हवामान पाहून करावे; पावसाची शक्यता असल्यास टाळावे. 3️⃣ उघड्यावर ठेवलेले सोयाबीन दाणे किंवा झडपी पिक ताडपत्री, प्लास्टिक शीट किंवा पॉलिथिन कव्हरने झाकून ठेवावेत. 4️⃣ ओलसर दाणे साठवू नयेत; पूर्ण वाळवूनच साठवण करावी. 5️⃣ साठवलेला शेतमाल उंच जागी व हवेशीर ठिकाणी ठेवावा. 6️⃣ विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्यास शेतात काम टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. Kanthak Suryatal Post Views: 415 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे निधन स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला”