नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथील एक सोन्याचे व्यापारी घरी जात असतांना न्यायालयाच्या शेजारील एरिगेशन कॉलनीमधील रस्त्यावर काही जणांनी त्यांना जखमी करून 5 लाख 53 हजार रुपयांची लुट केली आहे. बालाजी प्रभाकर मेढ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास ते आपल्या पुतण्यासह दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.जे.1998 वर बसून घराकडे जात असतांना तीन चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर येवून त्यांच्या दुचाकीला धडक देवून खाली पाडले, खंजीरच्या सहाय्याने डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले आणि सोन्या चांदीची बॅग आणि त्यातील रोख रक्कम असा एकूण 5 लाख 53 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 621/2024 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक भोसले हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,037 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नजर चुकवून 50 हजार चोरले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दारु दुकान फोडून चोरी