नांदेड(प्रतिनिधी)-पुयणी शिवारात 22 नोव्हेंबर रोजी सापडलेल्या मृतदेहासंदर्भाने 24 नोव्हेंबर रोजी लिंबगाव पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. बिर्याणीची पार्टी खातांना झालेल्या घटनेतून 19 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. तुकाराम उत्तमराव पतंगे रा.कवडी ता.कळमनुरी ह.मु.पुंडलिकवाडी महाविर चौक नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 व ाजेच्यासुमारास पुयणी शिवारातील राजवाडा धाब्याच्या पाठीमागे त्यांचा मुलगा आदित्य तुकाराम पतंगे (19) यास सुरज सोनटक्के रा.कॅनॉल रोड याने त्यांच्या मित्रांसोबत बिर्याणी पार्टी करत असतांना तु माझ्या भावासोबत का भांडला, त्याला का मारलास या कारणावरून खंजीरने आदित्य पतंगेच्या डोक्याला, पोटावर, छातीवर, जखमा करून त्याच्या खून केला आहे. लिंबगाव पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार सुरज सोनटक्के विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक सय्यद निजाम हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 2,143 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Biz bunu necə edirik: fast lotto “Təsadüfi” İD Sorğunu idarə etmək, üstünlüyü var न्यायालय परिसरात दोन वकीलांमध्ये तुंबळ हाणामारी