नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला कार बाहेर काढून तिन जणांनी त्याच्याकडील दहा हजार रुपये रोख रक्कम लुटली आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थ्याचा मोबाईल दोन जणांनी हिसकावून पळून गेले आहेत. मोबाईलची किंमत 13 हजार रुपये आहे. लोंढे सांगवी ता.लोहा येथील मारोती बालाजी लोंढे हे 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता किवळा ते लोंढे सांगवी या गावाकडे आपल्या चार चाकी वाहनात जात असतांना राजेश्र्वर नर्सरीसमोर हनुमंत बबन टर्के, दिगंबर संभाजी टर्के, ओमकार गोविंद टर्के, या तिघांनी त्यांची कार आडवून त्यांना बाहेर खेचले आणि खंजीरच्या धाकावर त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये बळजबरीने लुटले. सोबतच जिवे मारण्याची धमकी पण दिली. मारोती लोंढेच्या तक्रारीवरुन सोनखेड पोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 208/2024 नुसार दाखल केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार नागरगोजे हे करीत आहेत. अजय भास्कर बलूरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 नोव्हेंबरच्या रात्री 10.30 वाजता अशोकनगर पाण्याच्या टाकीजवळ आपल्या फोनवरून स्वत:च्या भावाला बोलत असतांना पायी चालत होते. कोणी तरी दोन व्यक्ती त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आले आणि त्यांच्या हातातील 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळून गेले. भाग्यनगर पोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 572/2024 नुसार नोंदवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक विश्र्वास देशमुख हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,127 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन भिकाऱ्यांनी भिकाऱ्याचा खून केला धार्मिक काम करता राजकीय क्षेत्रात कार्यरत झालेल्या भदंते पय्याबोधींवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करावा-प्रा.राजू सोनसळे