नांदेड(प्रतिनिधी)-बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे दागिणे चोरल्याची दुसरी घटना विमानतळ पोलीस ठााण्याने दाखल केली आहे. या घटनेत 2 लाख 70 हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच सिबरदरा ता.हदगाव येथे रेल्वेच्या कामाचे 3 लाख 7 हजार 140 रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. आकाश व्यंकटेश मामीडवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.15 वाजता ते महाराणा प्रताप चौक येथून त्यांच्या पत्नीसह हदगावकडून आलेल्या एसटी बसमध्ये बसले. ती गाडी उदगिरला जाणार होती. त्यांच्या जवळील कापडाच्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी अज्ञात महिलेने चोरले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 453/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे हे करीत आहेत. ओमप्रकाश अशोक माळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिबदरा अबादी येथे रेल्वेच्या कामाला लागणारे विविध साहित्य ठेवलेले आहे. दि.31 ऑक्टोबरच्या सकाळी 6 ते 2 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेदरम्यान या साहित्यातील 3 ल ाख 7 हजार 140 रुपयांचे साहित्य कोणी तरी चोरून नेले आहे. मनाठा पोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 185/2024 नुसार नोंदवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक कांबळे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,120 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सख्या भावाने आपल्या मुलांसह भावाचा खून केला स्थानिक गुन्हा शाखेने तिन चोरटे पकडून तिन गुन्हे उघडकीस आणले