नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव पासून भोकर-उमरी रस्त्यावर एका चाळीस वर्षीय अनोळखी माणसाचा खून केलेल्या अवस्थेतले प्रेत सापडले आहे. रामतिर्थ पोलीसांनी या संदर्भाने कोणी व्यक्ती गायब असेल तर त्यांनी रामतिर्थ पोलीसंाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. आज दिवाळीनंतरची पहिली पहाट उजाडताच नायगाव पासुन भोकर-उमरी जाणाऱ्या रस्त्यावर एक प्रेत दिसले. या संदर्भाची माहिती मिळताच रामतिर्थचे पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथकत तिकडे रवाना झाले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मरणाऱ्या व्यक्तीचे वय 40 वर्ष असावे. आज त्याची कोणतीही ओळख पटवता येईल असे काही चिन्ह त्या प्रेतमध्ये सापडले नाही. पोलीसांनी कायदेशीर कार्यवाही करत ते प्रेत उचलून रुग्णालयात नेले आहे. रामतिर्थ पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या घरातील, आपल्या आसपासचा कोणी व्यक्ती गायब असेल आणि त्याचा संपर्क होत नसेल तर रामतिर्थ पोलीसांशी संपर्क साधून झालेल्या घटनेतील व्यक्ती गायब झालेला व्यक्ती आहे काय ? याची शाहनिशा करावी. Kanthak Suryatal Post Views: 1,080 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गंगाखेड गुन्हे शोध पथकाने चोरीच्या सात दुचाकी पकडल्या शासकीय कार्यालयात आता शपथपत्र , प्रतिज्ञा पत्रासाठी मुद्रांक कागद लागणार नाही