नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद येथे 23 ऑक्टोबर येथे झालेल्या मारहाण संदर्भात काऊंटर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये 4 तोळ्याचे सोन्याचे लॉकीट गहाळ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. विनोदकुमार देवराव बोईनवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑक्टोबर रोजी दुपारी ते आपल्या वडीलांच्या मालकीच्या शेतात काम करीत असतांना राजू पांडे, आमन पांडे, धर्मेंद्र पांडे, महेंद्र पांडे आणि इतर 30 ते 40 लोकांनी हातात लाठ्या-काठ्या कोयते घेवून त्या शेतात प्रवेश केला आणि मारहाण करून गंभीर दु:खापती केल्या आहेत. या प्रकरणी धर्माबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 301/2024 दाखल केला आहे. यापुर्वी धर्माबाद पोलीसांनी महेंद्रकुमार पांडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 98/2024 दाखल केला आहे. संबंधीत बातमी… धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी Kanthak Suryatal Post Views: 999 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 4 लाख 25 हजार मारहाण करून नेले; अपहाराचा गुन्हा दाखल नांदेड-तामसा रस्त्यावर ट्रकच्या धडकेत ऍटोतील एक प्रवाशी ठार; इतर जखमी