*संघटनात्मक बांधणी व समीक्षा तसेच निवडणूक कार्यक्रम संदर्भात केली जाणार मोर्चे बांधणी* नांदेड -रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे रिपब्लिकन सेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेडची संघटना बांधणी व समीक्षा तसेच आगामी निवडणुक कार्यक्रम अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र महासचिव तथा नांदेड जिल्हा निरीक्षक प्रा. युवराज धसवाडीकर, महाराष्ट्र सचिव माधवदादा जमधाडे,रिपब्लिकन सेनेचे प्रा.राजू सोनसळे जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड, अनिल सिरसे जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस संघटनेच्या सर्व जुन्या व तसेच नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह समविचारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. Kanthak Suryatal Post Views: 898 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कविता हॉटेलला आगीने घेरले सर्व साहित्य जळून खाक आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम-सीईओ करणवाल