नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात खिचडी साठी प्रसिद्ध असलेल्या कविता हॉटेलमध्ये आज भीषण आग लागली आणि जवळपास हॉटेलमधील सर्व साहित्य जळून भस्म झाले आहे. एकूण किती नुकसान झाले आणि आग का लागली या संदर्भाची माहिती प्राप्त झाली नाही. अग्निशमन दलाने अत्यंत त्वरित प्रभावाने आग आटोक्यात आणली. नांदेड शहरात बाफना टी पार्टी येथे कविता हॉटेल आहे. कविता हॉटेलमध्ये खिचडी, वेगवेगळ्या प्रकारचे भजे, चहा, कॉफी, दूध असे साहित्य ग्राहकांसाठी तयार असते. या हॉटेलमध्ये अनेक वेळेस खिचडी खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना लांब लचक वाट पाहावी लागते. तरी पण लोक या खिचडीच्या प्रेमात एवढे आहेत की तेथे उभे राहून आपली बारी येण्याची वाट पाहतात. सध्या तापमान जास्त आहे.कविता हॉटेल ही पहिल्या मजल्यावर आहे. आणि आज दुपारी हॉटेलमध्ये अचानक आग लागली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कविता हॉटेलमधील सर्व साहित्य आगीने खाक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्वरित अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने अत्यंत त्वरित प्रभावाने आग आटोक्यात आणली आह. हॉटेल मालकाचे किती नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. तसेच आग कशी लागली याची ही माहिती प्राप्त झाली नाही. Kanthak Suryatal Post Views: 658 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राजू गिरीला प्रस्तापित करण्यासाठी नागपूरकर काका खेळणार पुन्हा एक नवीन खेळी Next Post