नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील तत्कालीन मालमत्ता विभागाचे इमारत निरीक्षक मनोहर महाजन दंडेवाड यांना कर्तव्यात कसूर व गंभीर दिरंगाई केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश मनपा प्रशासनाकडून २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.त्यांनी गाळ्यांवर का कार्यवाही केली नाहीं याबद्दल मनपा मध्ये मोदकांच्या चर्चा होत आहेत. निलंबनाचे मुख्य कारण इतवारा केली मार्केट येथील गाळा क्रमांक २५, २७, २९, ३० आणि ३३ मध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मालमत्ता विभागातील इमारत निरीक्षक मनोहर दंडेवाड यांना अधिकृत करण्यात आले होते. मात्र, त्यांनी संबंधित प्रकरणांमध्ये वेळेत गुन्हा दाखल न करता कर्तव्यात कसूर व दिरंगाई केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ चे कलम ४ नियम १ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ऑपरेशन सिंदूरनंतर ४ विमाने गायब? आंतरराष्ट्रीय डायरेक्टरीचा धक्कादायक खुलासा आणि उत्तरहीन प्रश्न!