नांदेड (प्रतिनिधी)-अनुदानित महाविद्यालयातील सेवा सोडून विना अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य म्हणून नेमणूक स्वीकारून समर्थपणे आव्हान पेलले आणि आज सेवानिवृत्त झाल्यानंतरही तेवढ्याच आपुलकीने आस्थेवाईकपणे विचारपूस करणारी माणसं मला भेटली यातच मी स्वतःला धन्य समजतो, असे भावोत्कट विचार सेवा निवृत्त प्राचार्य बाबूराव कदम यांनी व्यक्त केले. ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात भावविवश होऊन बोलत होते. हा कार्यक्रम अर्धापूर येथील पानसरे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांनी नांदेड येथील हाटेल नैवेद्यम येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी प्राचार्य पी.एम.कुंभेकर, माजी प्राचार्य रामनाथ पबितवार (सपत्नीक), माजी प्राचार्या भारती पोळ, माजी प्राचार्य आनंदराव मंगनाळे, माजी प्राचार्य डॉ.गणेशसिंह चौहान (सपत्नीक), माजी प्राध्यापक हनुमानदास जाजू (सपत्नीक), माजी क्रिडा संचालक आनंदराव मांजरमकर (सपत्नीक), माजी प्राचार्य डॉ. राम जाधव, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.कल्पना जाधव, लेखापाल गंगाधरराव पापूलवार, माजी विद्यार्थी तथा दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक आप्पाराव चव्हाण (लोहा), माजी ग्रंथपाल प्रा.गंगाधर होरके (भोकर), प्रा.आर.ई.मठवाले (पूर्णा), प्रा.वासुदेवराव गिजरे ( नांदेड), एम.जी मठ्ठमवार, गोविंद मांजरमकर, सेवानिवृत्त कोषागार अधिकारी एफ.आर. शेख, (पूर्णा), जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी किशन सोने, माजी कृषी अधिकारी एस.एल.कदम, सुभाष चंपतराव कदम (वारंगा फाटा), शिवाजीराव पोरडवार (अर्जापूर) आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी प्राचार्य बाबूराव कदम यांचा उपस्थितांनी सपत्नीक शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. राम जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. सस्नेह भोजनाचा आस्वाद घेत सर्व उपस्थितांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पानसरे परिवारातील सर्व सहकार्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या हृद सत्काराच्या नियोजनाबद्दल सर्वांनी आभार मानले. Kanthak Suryatal Post Views: 77 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकरमध्ये चौघांनी मिळून मोटारसायकल अडवून लुटले; १५ हजारांचा मुद्देमाल हिसकावला देगलूरमध्ये मंडळीच्या घरासमोर मारहाण; किनवटमध्ये तलवार-चाकूने हल्ला