खंजराचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल लंपास; चारही आरोपींना अटक भोकर (प्रतिनिधी) – भोकर येथील रिठा ते पांडुरणा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाला अडवून चौघांनी संगनमताने लुटल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. खंजराचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादीकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. या प्रकरणी भोकर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी अनिकेत रामदास भुरके (वय २०, रा. वाळकेवाडी, ता. हिमायतनगर) हे आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून जात असताना रिठा ते पांडुरणा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली आणि खंजराचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व एक मोबाईल फोन असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या प्रकरणी फिर्यादी अनिकेत भुरके यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(६) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात रवी कुमार दत्तात्रय कोरंटलू, हरीदास दिगांबर लक्कलवाड, अंकुश नामदेव लक्कलवाड आणि भगवान गोविंद बोईनवाड या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत. रस्त्यावर तरुणाला अडवून शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 54 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देगलूर पोलिसांची तमलूर शिवारात अवैध जुगार अड्ड्यावर धाड; ८ जणांवर गुन्हा दाखल, ₹१,८६,०५० चा मुद्देमाल जप्त