नांदेड(प्रतिनिधी) -पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासोबत नदीमध्ये सैर करून अवैध वाळू उपशाची एक मोठी कार्यवाही केली. यामध्ये करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. यानंतर एक नवीन चर्चा पोलीस दलात सुरू आहे. दसरा सणापुर्वी पोलीस दलात दोन ते तीन खंडीपेक्षा जास्त मोदकांचे ठेकेदार मुख्यालयात जमा होणार आहेत. पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन हे नांदेड अगोदर हिंगोली जिल्ह्यात कार्यरत होते. त्या ठिकाणी फक्त 13 पोलीस ठाणे आहेत. येथून नांदेडला येण्याअगोदर डॉ.नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्हा पोलीस दलातील मोदकांच्या 29 ठेकेदारांना मुख्यालयात जमा केले होते. नांदेड जिल्ह्यात 36 पोलीस ठाणे आहेत. मग याचा अंदाज लावला तर नांदेड जिल्ह्यात दोन ते तीन खंडी मोदकांच्या ठेकेदारांना लवकरच मुख्यालयात जमा केले जाणार आहे. मोदकांचे ठेकेदार मोदक आणून मोदकांचा थैलाभरून ज्यांना देतात त्यातील काही जणांना अगोदरच जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतू त्यांचा मोदकांचा थैला भरणाऱ्यांची वेळ आता जवळ आली आहे असे सांगितले जात आहे. कारण मोदक हे भगवान श्री गणेशांच्या आवडीचे असले तरी पोलीस दलात मोदक या शब्दांचा अर्थ मोठा भयंकर आणि रंजक आहे. मी नाही त्यातली म्हणत बरेच जण तेच करत असतात. पण आव मात्र सौज्वळ पणाचा आणतात. असो पण मिळालेल्या अत्यंत खात्रीलायक बातमीनुसार दसरा सणापुर्वी या मोदक ठेकेदारांना लवकरच बक्षीस मिळणार आहे. ते बक्षीस कोणाला, कोणत्या पध्दतीने आणि कसे दिले जाणार हे तर पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन त्याची यादी जाहीर करतील तेंव्हाच स्पष्ट होईल. शेवटी मोदक हा विषय पोलीस दलात सुध्दा पण मोठ्या रंजकतेने चर्चेचा विषय आहे. पण त्याला काही मर्यादा, काही एसओपी उपलब्धच नाही. म्हणून असे करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही होणे सुध्दा अपेक्षीत आहे आणि प्राप्त झालेल्या अत्यंत खात्रीलायक माहितीनुसार ही कार्यवाही दसरा सणापुर्वी होणार आहे. ? Kanthak Suryatal Post Views: 228 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कोर्टात जजसमोर वकील गरजला: आवाज खाली ठेवा! देश अन् न्यायव्यवस्था दोन्ही जळतायत!