नांदेड (प्रतिनिधी) – आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ-२०२६ च्या संयोजन समितीवर एम.जी.एम. पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय, नांदेडचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही नियुक्ती केली असून, त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ-२०२६ हा १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स महाविद्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागात, तर १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजक महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांना उपस्थित राहून संयोजन समितीच्या सदस्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 19 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा पुनर्वापर करा;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे वॉटर प्लांट चालकांना आवाहन