नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस आज नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर या मंदिरासह अनेक जगदंबा मंदिरात, दुर्गादेवी मंदिरात, शारदा देवी मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये व्यक्तीगत घटस्थापना करण्यात आली. सोबतच अनेक सार्वजनिक मंडळांनी आपल्या मंडपात देवीची स्थापना केली. आज सकाळपासूनच घटस्थापनेच्या संदर्भाने विविध वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दीच होती. नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे देवस्थान श्री क्षेत्र माहूर येथे आहे. तेथे आई रेणुकेच्या समक्ष घटस्थापना करण्यात आली. अत्यंत उत्साहात हा सोहळा पार पडला. जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये घट स्थापना पुर्ण झाली. जिल्ह्यात अनेक घरांमध्ये घट स्थापनेची पुजा करण्यात आली. सोबतच जिल्हाभरात जवळपास अडीच हजार सार्वजनिक दुर्गा मंडळांनी आप-आपल्या मंडपात घटस्थापना केली. वाजत-गाजत आई जगदंबेचा जय घोष करत मिरणुकीच्या माध्यमातून अनेक मुर्ती मंडपात पोहचल्या. वृत्तप्रसारीत करेपर्यंत सुध्दा सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या मुर्ती मंडपाकडे जात आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार दुर्गा मुर्तींची प्रतिष्ठापणा झाली असेल आणि 500 च्या आसपास शारदा मुर्तींची प्रतिष्ठापणा होणार आहे. अत्यंत आंनदी वातावरणात सर्वत्र घटस्थापना झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 50 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागाकडून प्रवासी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना तीव्र; विविध विशेष मोहिमांमध्ये अनेक प्रकरणांची उकल