नांदेड (प्रतिनिधी) – यावर्षी पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे असताना, प्रभाग क्रमांक ८, छत्रपती शिवाजीनगर तसेच नांदेड शहरातील विविध भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीमुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असून, नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनची पाहणी करून गळतीच्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक सत्यपाल सावंत, प्रभाग क्रमांक ८, छत्रपती शिवाजीनगर यांनी केली आहे. पाणी बचतीसाठी प्रशासनाने नियमित पाहणी व देखभालीची प्रभावी व्यवस्था करावी, तसेच पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महाराष्ट्र शासनातर्फे कवी माधव चुकेवाड यांच्या दोन पुस्तकांची निवड