ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद नांदेड (प्रतिनिधी) – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपा निवडणूक जिंकण्यासाठी वेळोवेळी काम केले आहे हे आता सिद्ध झाले आहे. ज्ञानेश कुमार यांनी मनमानी कारभार करत गैर पद्धतीने एसआयआर मोहीम राबवली आहे. जो पर्यंत ज्ञानेश कुमार राजिनामा देत नाही, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असे ठाम प्रतिपादन खा. रवींद्र चव्हाण यांनी महामोर्चा दरम्यान केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासह एसआयआर रद्द करा व निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्या या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (उबाठा), सीपीआय, आम आदमी पार्टीसह इंडिया आघाडीच्या वतीने बुधवार (ता.७) रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान महामोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. रवींद्र चव्हाण हे बोलत होते. ज्ञानेश कुमार हटावो, लोकशाही बचावो अशी प्रचंड घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या महामोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, यावेळी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, रोहीदास चव्हाण, काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार, प्रा. यशपाल भिंगे, सुरेशदादा गायकवाड, डॉ. श्रावण रँपनवाड, तिरुपती पाटील कोंडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, प्रदिप नागापूरकर, तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम, सतीश उमरेकर, नगरसेवक मुन्ना अब्बास, सीपीएमचे विनोद गोविंदवार, राष्ट्रवादीचे तातेराव पाटील आलेगावकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, महानगरप्रमुख मनोज यादव, सीपीआयचे कॉ. गंगाधर गायकवाड, अनिल मोरे, राजेश पावडे, आनंदराव गुंडिले, बालाजी गाडे, कुमार कुर्तडीकर, शिवाजी पाटील पाचपिपळेकर, नगरसेवक सत्यपाल सावंत, पाशा भाई, शोहब हुसेन, मोसिम खान, शहबाज फहिज, मो. इब्राहिम, राजू गोडबोले, महेश देशमुख तरोडेकर, गणेश ढगे, अजिज कुरेशी, मुन्तजिब, शेर अली, डॉ. बाकी, संदिप देशमुख, सुरेश हटकर, सचिन टाले, विनोद कांचनगिरे, दिपकसिंग हुजारिया, बापूसाहेब पाटील, प्रवीण कानगुले, रमेश चित्ते, अब्दुल रहिम, संजय वाघमारे, गगन यादव, उज्वला पडलवार, मीना आरसे, देशमुख मॅडम तरुणुम पठाण, ज्योती कदम, जेसिका शिंदे, नसिम पठाण, ललिता कुंभार, सुरेखा वैद्य, विमल किर्तने, वेंकोबा येडे पाटील, बालाजी पेनुरकर, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, सुरज शिंदे, अक्षय नळगे, निरंजन पावडे, नागराज सुलगेकर, विजय सोंडारे, गणेश कोकाटे, जसपालसिंघ तबेलेवाले, संजय कौठेकर, प्रीतम जोंधळे, शेख कलिम, गोविंद पाटील, अमोल कदम खडकीकर, श्रीकांत जोंधळे, तात्याराव शिंदे दिवाजी कदम कालिदास कोरले प्रल्हाद साळुंखे बाबासाहेब देशमुख, प्रकाश दिपके, अझर शेख, आदीसह इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते महामोर्च्यात मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. Kanthak Suryatal Post Views: 37 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जालना-नांदेड समृद्धी महामार्गाला श्री गुरु गोविंद सिंघ जी समृद्धी महामार्ग नाव देण्याची नांदेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी